Uncategorized
Trending
अकलूजच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ.रेशमा लालासाहेब अडगळे यांच्या उमेदवारीसाठी एकवटला अकलूज मधील संपूर्ण मातंग समाज
अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोहिते पाटील परिवाराचे कट्टर समर्थक मातंग समाजाचे नेतृत्व श्री लालासाहेब अडगळे यांच्या पत्नी सौ.रेश्मा लालासाहेब अडगळे यांचे नाव सद्या अकलूज परिसरात नगराध्यक्ष पदासाठी जवळ जवळ निश्चित झालेले आहे असेच वाटत असताना अकलूज मधील संपूर्ण मातंग समाजाने ही आपल्या समाजाचा उमेदवार म्हणून सौ. रेश्मा लालासाहेब अडगळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे ,
. आज पर्यंत कधी न एकवटलेले मातंग समाजाचे सर्व प्रभागामध्ये काम करीत असलेले मातंग समाजाचे नेते कार्यकर्ते यांनी सौ.रेश्मा लालासाहेब अडगळे यांना पाठिंबा दिल्याने त्याची उमेदवारी निश्चित समजली जात आहे अशी चर्चा सर्व अकलूज परिसरात सुरू आहे .

