Uncategorizedशहर

मोहिते पाटलांच्या दोन प्रभागामधून मधून दोन ‘तोफा’ आता नगरपालिकेत धडाडणार ?

माळशिरस तालुक्यातील राजकारणाला नवा आयाम देत, मोहिते पाटील कुटुंबातील दोन्ही ‘तोफा’ आता थेट नगरपालिकेच्या राजकारणात धडकणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘मोहिते पाटलांच्या दोन्ही तोफा’ म्हणजे प्रभाग ९. मधून संजय साठे आणि प्रभाग ६ मधून ॲड.रणजीत भोसले आता नगरपालिकेत धडाडून, अकलूज मधील मोहिते पाटील विरोधकांचे झोप उडवणार आहेत असे बोलले जात आहे.💥

काय आहे चर्चा? माळशिरस आणि परिसराच्या राजकारणावर मोहिते पाटील कुटुंबाचा दबदबा आहे. ग्रामीण राजकारणासोबतच, आता नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून शहरी विकासाच्या केंद्रस्थानी राहण्याची तयारी आज पर्यंत या कुटुंबाने दाखवली आहे. परंतु निव्वळ पैशाच राजकारण करू पाहत असलेल्या संपूर्ण माळशिरस तालुक्यातील विरोधकांना फक्त मोहिते पाटलाचे हे दोनच कार्यकर्ते पुरून उरतील अशी चर्चा चालू आहे

रणनीती: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोहिते पाटील गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे

लक्ष्य: स्थानिक नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या मूलभूत सुविधा, विकास प्रकल्प आणि नागरिकांच्या समस्यांवर थेट लक्ष केंद्रित करणे, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button