शहर

अकलूज नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक. ९ मधून मोहिते पाटील गटाकडून श्री.संजय साठे यांच्या उमेदवारीची जनसामान्यातून मागणी होत आहे

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेली अकलूज नगर परिषदेचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे प्रत्येक प्रभागांमधून प्रबळ दावेदार असणारी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे परंतु प्रभाग क्रमांक ९ मधून मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थकमानले जाणारे श्री. संजय साठे यांच्या नावाची जनसामान्यातून चर्चा होत आहे .

. श्री संजय साठे हे अकलूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत त्यांना मिळालेल्या अवघ्या सहा महिन्याच्या अवधीमध्ये माननीय जयसिंह मोहिते पाटील , खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील साहेब व शिवतेजसिंह मोहिते पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महर्षी कॉलनी अकलूज येथील मातंग समाजाच्या दीडशे ते दोनशे कुटुंबाचे पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. सर्वसामान्यांच्या जनहिताचे कामे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे मोहिते पाटील परिवारचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे अशा प्रभावशाली व्यक्तित्व असणारे श्री .संजय साठे यांना प्रभाग क्रमांक ९ साठी उमेदवारी मिळावी अशी जनतेतून मागणी होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button